पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना नुकताच प्रतिष्ठित ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कार’ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. आरोग्य सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील आघाडीची बायोटेक कंपनी असून, ती विविध आजारांवरील उपाय ठरणाऱ्या जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे उत्पादन करणारी (डोसांच्या संख्येनुसार) जगातील सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे. डॉ. सायरस पूनावाला यांना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.